ठाणे महापालिका आणि डी-मार्टच्या अधिका-यांनी केलेल्या पालिका शाळेच्या पाहणीला आम आदमी पक्षाचा विरोध

ठाणे महापालिका आणि डी-मार्टच्या अधिका-यांनी केलेल्या पालिका शाळेच्या पाहणीला आम आदमी पक्षाने विरोध केला. डी मार्टच्या अधिकाऱ्यांसोबत शिक्षण मंडळ उपाध्यक्ष विकास रेपाळे, शिक्षणाधिकारी पारधे आणि शिक्षण उपायुक्त मनीष जोशी यांनी  डवलेनगर, सावरकर नगर येथील शाळेत पाहणी दौरा आयोजित केला होता. या पाहणीला विरोध करण्यासाठी आम आदमी पार्टीने घोषणा दिल्या आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. थातुरमातुर उत्तरे देत चर्चा टाळण्याचा त्यांचा प्रयत्न आम आदमी पार्टीच्या  विरोधाने हणून पाडला. डी मार्ट आपल्या नफ्यातून पालिकेच्या शाळांमध्ये खूप सुविधा करीत आहे, केवळ हा नफ्याचा भाग घेऊन सुविधा करण्याऐवजी या खाजगी शाळा आता एक एक योजना पुढे आणत जनतेच्या शाळा काबीज करण्याचा हा डाव आहे. आधी या शाळेत जिथे लहान मुलांचे बालवाडीचे वर्ग भरतात तिथे डी मार्ट आपले ऑफिस करणार होती, पालकांच्या विरोधामुळे त्यांना आणि पालिकेला माघार घ्यावी लागली, आता डिजिटल वर्ग आणि डिजिटल लायब्ररी आणि प्रयोगशाळा करण्याच्या नावाखाली हे वर्ग खाजगी संस्थांना, कंपन्यांना देण्याचा डाव आहे, असे आम आदमी पक्षाचे मत आहे. आपली लहान मुले आताच्या जागेत सुरक्षित आहेत, त्यांचे वर्ग शिक्षणयोग्य पद्धतीने रंगविले आहेत, हे वर्ग डी मार्टला दिल्यास मुलांना नवीन जागेत टॉयलेट पासून अनेक असुविधा सहन कराव्या लागतील, मुले असुरक्षित होतील म्हणून पालकांनी देखील हे वर्ग डी मार्टला देण्यास विरोध केला होता. सुविधा योग्य केल्याशिवाय आपण वर्ग बदलणार नाही, त्यासाठी तुम्हाला देखील निरीक्षण करण्यासाठी बोलावू असे आश्वासन देऊनही आज अचानक डी-मार्ट च्या अधिकाऱ्यांसोबत पालिकेचे अधिकारी आणि शिक्षण मंडळ अध्यक्ष काही सूचना न देता निरीक्षण करतात, कोणतेही लेखी उत्तर देत नाहीत म्हणजेच प्रयोगशाळा आणि लायब्ररी सुरू करण्याच्या नावाखाली हे वर्ग सरळ डी मार्टला दिले जातील हे आता अधिक स्पष्ट झाले आहे. म्हणूनच निरीक्षणाच्या वेळी हजर राहून आम आदमी पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांनी डी मार्ट हटाव – मनपा शाळा बचाव, आयुक्तांची दादागिरी नही चलेगी अशा घोषणा देत विरोध केला. दरम्यान सोमवारी शिक्षण मंडळाबरोबर चर्चा करण्याचे निमंत्रण मिळाल्याने विरोध थांबवण्यात आला.

 

Leave a Comment

%d bloggers like this: