दिवाळीसाठी परिवहन सेवेची खास हॉप अॅण्ड शॉप सेवा

दिवाळीसाठी ठाणेकरांना आपल्या आवडीची खरेदी करण्याकरिता  इच्छित स्थळी पोहचण्यासाठी परिवहन सेवेकडून हॉप ॲण्ड शॉप ही खास बससेवा सुरु करण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. दिवाळी दरम्यान रविवार २८ ऑक्टोंबर ते सोमवार १२ नोव्हेंबर या कालावधीत हॉप ॲण्ड शॉप ही खास बससेवा चालविण्यात येणार आहे. या बससेवेसाठी प्रवाशांना पुर्ण  दिवसासाठी 40 रुपये दराचे तिकिट निश्चित करण्यात आले असुन या  तिकिटाचा वापर करून हॉप ॲण्ड शॉप या विशेष बससेवेमधुन नागरिकांना प्रवास करता येणार आहे. कासारवडवली नाका, वाघबीळ गांव,  भूमीएकर, हिरानंदानी सर्कल, गावंडबाग, टिकुजीनीवाडी येथून या बसेस राम मारूती रोड, गोखले रस्ता, मल्हार चित्रपटगृहापर्यंत येणार असून पुन्हा परत आपल्या ठिकाणी जाणार आहे. शहरातील नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन सेवेकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading