CISCE राष्ट्रीय स्कूल गेम्स २०२२ महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर

पश्चिम बंगाल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बोर्ड अंतर्गत येणाऱ्या देशातील ICSE शाळांच्या टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर धडक दिली.
हि स्पर्धा १४ ,१७ १९ मुले व मुली या वयोगटात आयोजित करण्यात आली होती महाराष्ट संघाची निवड हि तुषार धायगुडे यांच्या अध्यक्षते खाली मुंबई येथे करण्यात आली.निवड चाचणीत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ३०० मुलांनी भाग घेतला होत.त्यातील ऐकून १५ मुले व १५ मुली यांची निवड करण्यात आली. पश्चिम बंगाल येथे बंगाल टेनिस असोसिएशन येथे या स्पर्धा झाल्या. १४ वर्षीय गटात क्रिशांक जोशी,तनय कोटक,आर्यन कीर्तने,ऋषिकेश माने,धैर्य विमल यांनी सुवर्ण पदक जिंकले.महाराष्ट्र संघात १९ वर्षी मुलांत जय दीक्षित ,वीर प्रसाद ,अंशुल दर्डा ,नील कोयट्स,यांनी महाराष्ट्राला रजत पदक मिळवून दिले.१७ वर्ष मुलांच्या गटात लक्ष गुजराती,अर्जुन कीर्तने, रिआन मुजगुले यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले.
एकेरीत १४ वर्ष मुलांत क्रिशांक जोशी याने सुवर्ण ,१७ आणि १९ वर्ष मुलांच्या स्पर्धेत लक्ष गुजराती आणि जय दीक्षित यांनी रजत पदक जिकून राज्याची मान उंच केली. मुलींच्या १७ वर्ष स्पर्धेत इरा शाह ,सेरेना रॉड्रीक, योगंजली सरुक यांनी सुवर्ण पदक मिळवून दिले. १४ वर्षीय मुलीत शिबानी गुप्ते,कीर्तीयांनी घाटकर, मानसी ताम्हणकर,शंभवी शिंदे,अनन्या मोहता यांनी रजत पदक पटकावल. तसेच १९ मुलींच्या एकेरीत अलिशा देवगावकर हिने कांस्य पदक जिंकले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading