जागतिक दृकश्राव्य वारसा दिनानिमित्त एका मैफीलीचं आयोजन

जागतिक दृकश्राव्य वारसा दिनानिमित्त सांस्कृतिक विभागातर्फे एका मैफीलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शास्त्रीय रागदारीवर आधारीत मराठी-हिंदी गीतांची ही बहारदार मैफील किसननगर मध्ये आयोजित करण्यात आली होती. पिनाक संगीत अकादमीच्या संचालिका भारती न्यायाधीश यांनी यमन रागातील तुज मागतो मी आता गजानना या ईशस्तवनाने मैफिलीची सुरूवात केली. त्यानंतर दीपक धात्रक या गायकासोबत विविध रागांवर आधारीत मराठी हिंदी गाणी सादर करून त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. आपकी आँखो में कुछ महके हुए अंदाज है, जिया ले गयो जी मोरा सावरीया, ना जीया लागेना, धुंद मधुमती रात रे, रिमझिम गिरे सावन, तेरे मेरे मिलन की रैना अशा काही गीतांनी ही मैफील उत्तरोत्तर रंगत गेली. भारती न्यायाधीश यांनी गायलेल्या वंदे मातरम् या देशभक्तीपर गीताने मैफिलीची सांगता झाली. या मैफिलीत गायकांना सुभाष मालेगावकर, मयुरेश शेर्लेकर, एन. पिनाक आणि सुशांत बर्वे यांनी साथ केली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading