राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त चला चंद्रावर जाऊया या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी कचराळी तलाव येथे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांचं चला चंद्रावर जाऊया या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी शून्य गुरूत्वाकर्षणातून प्रवास, चंद्रावरून दिसणारे आकाश, चंद्र विवर या विषयी दा. कृ. सोमण माहिती देणार आहेत.