वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी तीन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वा रे मोदी तेरी चाल-वंचित एमआयएम तेरे दलाल तसेच एनसीआर आणि सीएए विरोधात वंचितने एकही आंदोलन केलं नाही. एससीएसटी विरोधात निर्णय होत असताना वंचित शांत आहे. आता कुठे गेले रक्त असा प्रश्न उपस्थित केला होता. या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. प्रणिती शिंदे यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राजाभाऊ चव्हाण यांनी दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading