ठाणे रेल्वे स्थानकाच्या जागेसाठी मनोरूग्णालयाच्या जागेवरील आरक्षण बदलण्यास शासनाची मंजुरी

नवीन ठाणे रेल्वे स्थानकासाठी मनोरूग्णालयाची जागा देण्याकरिता या जागेवर असलेल्या आरक्षण बदलास शासनानं मंजुरी दिली आहे. त्यामुळं या रेल्वे स्थानकामधील मोठा अडथळा दूर झाला आहे. नगरविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या जमिनीवरील आरक्षणामध्ये बदल करण्यास मंजुरी देण्यात आली. ही जागा मनोरूग्णालय, पंपिंग स्टेशन आणि महापालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी राखीव होती. मात्र आता या जागेच्या आरक्षणात बदल करण्यात आला असून ही जागा नवीन ठाणे रेल्वे स्थानक, बस टर्मिनससाठी आरक्षित करण्यात आली आहे. ठाणे मनोरूग्णालयाची स्थापना १९०१ मध्ये झाली. या रूग्णालयाच्या क्षमतेपेक्षा अधिक रूग्ण या रूग्णालयात आहेत. मनोरूग्णालयाच्या जागेत रेल्वे स्थानक, बस टर्मिनस तसंच पार्किंगसाठी जागा, रस्ते आणि इतर आवश्यक बाबी उभारल्या जाणार आहेत. आता जागेचं आरक्षण बदलण्यात आल्यामुळं नवीन ठाणे रेल्वे स्थानकातील अडथळा दूर झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading