वसुलीवर भर देऊन महसुली खर्चात कपात करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय आढावा बैठकीस कालपासून सुरूवात झाली आहे. महापालिकेचा २०२०-२०२१ चा मूळ अर्थसंकल्प आणि सुधारीत अर्थसंकल्पाबाबत जास्तीत जास्त वसुलीवर भर देऊन महसुली खर्चात कपात करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या आढावा बैठकीत दिले आहेत. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत या अर्थसंकल्पामध्ये किती उत्पन्न वाढ प्रस्तावित आहे, महापालिकेच्या प्राप्त उत्पन्नाच्या स्रोतातून जास्तीत जास्त वसुलीवर भर देऊन उत्पन्नात वाढ कशी करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading