जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या जलतरण पटूंनी केली पदकांची लयलूट

डोंबिवली जिमखाना येथे झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या जलतरण पटूंनी पदकांची लयलूट केली. ५० आणि १०० मीटरच्या स्पर्धेत ईशांत चतुर्वेदी यानं ३ सुवर्ण आणि १ रौप्य पदक पटकावत वैयक्तीक विजेतेपदं पटकावली. आदित्य घाग याने २ सुवर्ण, २ रौप्य पदकासह विजेतेपद प्राप्त केलं. विराट ठक्कर यानं ३ सुवर्ण, १ रौप्य पदक, विहान चतुर्वेदीनं १ सुवर्ण ३ कांस्य, आदेश ठाणेकरनं १ सुवर्ण १ रौप्य, प्रशांत साळुंकेनं १ रौप्य, १ कांस्य तर आर्यन शहानं १ कांस्य पदक पटकावलं. विजयदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या जलतरण पटूंनी विशेष कामगिरी करत पदकं प्राप्त केली. ५०० मीटर स्पर्धेत आयुषी आखाडेला प्रथम, श्रुती जांभळेला ६वा, आयुष तावडेला बारावा क्रमांक मिळाला. २ किलोमीटरच्या स्पर्धेत नील वैद्यला चौथा, वेदांत गोखलेला सातवा तर मानव मोरेला आठवा क्रमांक मिळाला. ५ किलोमीटरच्या स्पर्धेत चिरायु चेऊलकरला बारावा क्रमांक मिळाला.

Leave a Comment

%d bloggers like this: