education

समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीनं चालवल्या जाणा-या विशेष प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन

हसत खेळत तणाव न घेता नेटानं अभ्यास करा आणि गुण मिळवण्यासाठी परीक्षेत योग्य रितीने उत्तर लिहा असं बहुमोल मार्गदर्शन इंग्रजीचे सुप्रसिध्द शिक्षक पी. बी. भालेकर यांनी केले. महापालिका माध्यमिक शाळांमधून शिक्षण घेणा-या शालांत परीक्षेच्या अत्यंत गरजू विद्यार्थ्यांसाठी समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीनं पुढील वर्षभर चालवल्या जाणा-या विशेष प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन झालं त्यावेळी भालेकर बोलत होते. १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या वर्गाचा लाभ घेतला. इंग्रजीची भीती न बाळगता प्रश्नपत्रिकेत उत्तरं शोधण्यच्या युक्त्या सांगून मुलांचा आत्मविश्वास त्यांनी द्विगुणित केला. भाषा विषयात प्राविण्य मिळवायचं असेल तर भरपूर वाचन करून शब्द भांडार विकसित करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. विज्ञानातील नियम शिकवताना निव्वळ पाठांतरावर विसंबून न राहता त्यामागची सूत्रं समजून घ्यावी, वर्गात नीट लक्ष द्यावं, शिकवलेलं समजलं नाही तर प्रश्न विचारावेत असं ज्येष्ठ शिक्षक शैलेश मोहिले यांनी सांगितलं. हे वर्ग एकाच वेळी सावरकर नगर, घोडबंदर रोड, उथळसर अशा ३ ठिकाणी चालवले जाणार आहेत. वर्षभर दहावीच्या विविध विषयांवर तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन, सराव परीक्षा, व्यक्तीमत्व विकास, छंद वर्ग, करिअर प्रबोधन, विविध क्षमता चाचण्या असे उपक्रम राबवून केवळ दहावी नाहीतर संपूर्ण व्यक्तीमत्व विकास, जीवन विकास आणि त्यातून दीर्घकालीन परिणाम साधू शकणारे एकलव्यांचे सक्षमीकरण अशी संस्थेची इच्छा असल्याचं संजय मंगला गोपाळ यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *