कळवा पूर्व रेल्वे स्थानकाजवळ मेडीकल स्टोअर्स मध्ये चोरीच्या उद्देशानं शिरलेल्या चोरट्यानं केली कर्मचा-याची हत्या

कळवा पूर्व रेल्वे स्थानकाजवळ शिवाजीनगर परिसरात एका मेडीकल स्टोअर्स मध्ये चोरीच्या उद्देशानं शिरलेल्या चोरट्यानं गोळी झाडून एका कर्मचा-याची हत्या करण्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. कळवा पूर्व शिवाजीनगर येथे रामसिंग राजपुरोहित यांचे वीर युवराज मेडीकल नावाचे मेडीकल स्टोअर्स आहे. या दुकानात रामसिंग यांचे नातेवाईक प्रेमनाथ राजपुरोहित हे काम करतात. रात्री काम संपल्यावर दुकान बंद करून प्रेमनाथ दुकानातच झोपतात. आज पहाटे पावणे चारच्या सुमारास शटर उचकटून चोरी करण्याच्या उद्देशानं दुकानात शिरलेल्या चोरट्यांची चाहूल प्रेमनाथ यांना लागली. तेव्हा त्यांनी चोरट्याला प्रतिकार केला असता चोरट्यानं गोळी झाडून प्रेमनाथ यांची हत्या केली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यातील फूटेजच्या माध्यमातून हल्लेखोर चोरट्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading