दक्षिण कोरियन दूतावास अधिका-यांची ठाणे महापालिकेला भेट

ठाणे स्मार्ट सिटीतर्फे राबवण्यात येणा-या प्रकल्पांची माहिती घेण्याकरिता साऊथ कोरियाच्या दूतावासातील वरिष्ठ अधिका-यांनी महापालिकेस भेट दिली. ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या एक्स्पिरियन्स सेंटरसाठी वापरण्यात येणा-या तंत्रज्ञानाची माहिती, स्मार्ट पार्किंग, कमांड अँड कंट्रोल सेंटर, मोबाईल ॲप, जीआयएस आदी प्रकल्पांची एका बैठकीत चर्चा करण्यात आली. साऊथ कोरियामध्ये उभारलेल्या एक्स्पिरियन्स सेंटरची माहिती यावेळी घेण्यात आली. साऊथ कोरियाच्या दूतावासाचे उपसंचालक डॉ. डी. एच. री, रिसर्च मॅनेजर अंकुर जैन या बैठकीस उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading