ठाणे महापालिका मुख्यालयातील शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणा-या शिल्पचित्राची वारंवार डागडुजी न करता नव्यानं शिल्प तयार करावं असे आदेश महापौरांनी प्रशासनास दिले आहेत. सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे महापौरांना या आशयाचं एक निवेदन देण्यात आलं त्यावेळी महापौरांनी हे आदेश दिले. महापौरांनी नगर अभियंता आणि सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांशी संकल्प चित्राबाबत चर्चा केली. महापालिका मुख्यालयावरील शिल्पचित्राबाबत पाहणी करण्यासाठी नेमलेल्या तज्ञांनीही शिल्प नव्यानं बनवण्याबाबत सूचित केलं होतं. महापालिका मुख्यालयावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे संकल्प चित्र हे त्या क्षेत्रातील दिग्गज कलादिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार यांच्याकडून मागवून त्या धर्तीवरून नामवंत शिल्पकाराकडून ते शिल्प बसवण्याची सूचना महापौरांनी केली आहे.