ठाण्याच्या स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या जलतरण पटूंनी केली पदकांची लयलूट

थायलंड येथे झालेल्या ओशिएनमॉन स्पर्धेत ठाण्याच्या स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या जलतरण पटूंनी पदकांची लयलूट करत ठाण्यासह भारताच्या नावलौकीकात भर टाकली आहे. जगातील ५० देश सहभागी असलेल्या या स्पर्धेत ठाण्यातील जलतरण पटू प्रथमच सहभागी झाले होते. या स्पर्धेत ९ जलतरण पटू सहभागी झाले होते. १० किलोमीटर स्पर्धेत अर्चित साली याने तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदक मिळवलं. २ किलोमीटर स्पर्धेत चिरायू चोलकर यानं २३वा तर विजय ओजाळे यानं ५१वा क्रमांक पटकावला. १ किलोमीटर स्पर्धेत आयुषी आखाडेनं कांस्य पदक पटकावलं. विराट ठक्कर यानं पाचवा, राजेश पुफलेटवाला यानं आठवा, श्रेया शहा हिने दहावा, युवराज रॉय याने चौदावा तर तुषार गद्रेनं १५वा क्रमांक पटकावला. १० किलोमीटर स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावलेल्या अर्चित साली याची मेक्सिको येथे होणा-या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे सर्व जलतरण पटू मारोतराव शिंदे तरण तलावावर सराव करतात.

Leave a Comment

%d bloggers like this: