कळवा रूग्णालयातील एक वॉर्डबॉय दारू पिऊन रूग्णालयाच्या आवारातच पडल्याची घटना

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील एक वॉर्डबॉय दारू पिऊन रूग्णालयाच्या आवारातच पडल्याची घटना काल पहायला मिळाली. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय नेहमी या ना त्या कारणानं गाजत असतं. या रूग्णालयात रोज हजारो रूग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रूग्णालयात नेहमी गर्दी असते. काल संध्याकाळी ५च्या सुमारास एक वॉर्डबॉय महत्वाच्या कागदपत्रांसह दारूच्या नशेत रूग्णालयाच्या आवारातच पडल्याची घटना घडली. हा वॉर्डबॉय ऑर्थोपेडिक विभागात काम करतो. डॉक्टरनी त्याच्याकडे महत्वाच्या कागदपत्रांची फाईल दिली होती. मात्र त्यानं ही फाईल संबंधित विभागात न पोहचवता दारूच्या नशेत रूग्णालयाच्या आवारातील हिरवळीवरच झोपी गेला. त्याच्या जवळच कागदपत्रांची फाईल पडली होती. रूग्णालयाच्या आवारात गस्त घालणा-या सुरक्षा रक्षकांना हे दिसलं आणि त्यांनी ही बाब रूग्णालयाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणली. रात्री ११ वाजता त्याला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading