महापालिकेच्या कारवाईअंतर्गत १७३ हातगाड्या, ४१ टप-या, ३०६ पदपथावरील बांधकामं जमिनदोस्त

अतिक्रमण मुक्त पदपथ, अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सवरील ठाणे महापालिकेची कारवाई दुस-या दिवशीही सुरूच असून काल या कारवाईअंतर्गत १७३ हातगाड्या, ४१ टप-या, ३०६ पदपथावरील बांधकामं जमिनदोस्त करण्यात आली. शहराच्या विविध परिसरात अतिक्रमण विरोधातील कारवाई जोरात सुरू आहे. वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रात ४० गाड्या, ७ पोस्टर्स, दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात ७ गाड्या, २० बॅनर्स, माजिवडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात पदपथावरील ५ अतिक्रमणं, १२ फेरीवाले, ३५ हातगाड्या, २ पोस्टर्स आणि १ बॅनर, वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये पदपथावरील ७० अतिक्रमणं, २६ फेरीवाले, नौपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये पदपथावरील ६० अतिक्रमणं, १० हातगाड्या, ५ बॅनर्स, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात पदपथावरील २० अतिक्रमणं, ३१ हातगाड्या, ५ पक्क्या टप-या, ६ बॅनर्स, कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये पदपथावरील २५ अतिक्रमणं, १७ हातगाड्या, ८ पक्क्या टप-या, १२ पोस्टर्स, दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये पदपथावरील ३८ अतिक्रमणं, १८ हातगाड्या, ५ बॅनर्स, मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये ८ लाकडी बाकडी, ९ लोखंडी स्टँड, ३ शेगड्या, सिलेंडर, २२ ठेले, ५ वेदरशेड तर उथळसर प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये पदपथावरील ३८ अतिक्रमणं, १७ गाड्या, २२ पक्क्या टप-या निष्कासित करण्यात आल्या. ही कारवाई उद्या म्हणजे शुक्रवारपर्यंत चालणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading