crime

नामवंत कंपन्यांची बनावट खोकी तयार करण्याप्रकरणी भिवंडी पोलीसांनी केली एकास अटक – २५ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

भिवंडी पोलीसांनी नामवंत कंपन्यांचे बनावट बॉक्स बनवणा-या एका व्यक्तीस अटक केली असून त्याच्याकडून २५ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड येथील ८ क्रमांकाच्या गाळ्यामध्ये एचपी, कॅनन, सॅमसंग आणि ॲप्सन अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाचा वापर करून कार्ट्रेजचे नकली बॉक्सेस तयार केले जात असल्याची माहिती भिवंडी पोलीसांना मिळाली होती. भिवंडीच्या पोलीस उपायुक्तांनी या माहितीच्या खातरजमेसाठी पोलीसांचं एक पथक पाठवलं. त्यावेळी असे कार्ट्रेजचे पॅकींग करण्याचे बॉक्सेस मिळाले. त्यावेळी किशोर बेरा या व्यक्तीला पकडले. बेरा हा अशा नामवंत कंपन्यांच्या कार्ट्रेजचे बॉक्सेस तयार करत होता. पोलीसांनी याप्रकरणी त्याला अटक केली असून जवळपास २५ कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Comment here