ठाणे वाहतूक शाखेला मिळाली दोन अत्याधुनिक वाहनं – यामुळे वाहतुकीला लागणार शिस्त

पोलीस दलाच्या आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ठाणे शहर वाहतूक शाखेला दोन अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनं मिळाली आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या हस्ते या दोन वाहनांचा वाहतूक शाखेत समावेश करण्यात आला. आत्तापर्यंत अशाप्रकारच्या वाहनात फक्त वेगमर्यादा ओलांडणा-या वाहनांना पकडता येत होतं. पण ही २ नवी वाहनं अति अत्याधुनिक असून लेझर स्पीड गन आणि कॅमे-यामुळे सीटबेल्ट नसणं, मोबाईलवर बोलणं, विनाहेल्मेट असे नियमभंग या गाडीमुळे सहज पकडता येणार आहेत. यामध्ये प्रिंटरचीही सुविधा देण्यात आली आहे. ही गाडी संपूर्णत: स्वयंचलित असून नियमभंग करणा-यांना थेट मोबाईलवर नोटीस जाणार आहे. लेझर गन असल्यामुळे टारगेट केलेल्या गाडीचा नियमभंग पकडता येणार आहे. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणा-या वाहन चालकाला अत्याधुनिक तंत्राने ई-चलन तयार होऊन त्याच्या मोबाईलवर नोटीस मिळणार आहे. या वाहनामध्ये मद्यपि व्यक्तींची तपासणी करण्यासाठी श्वास विश्लेषक उपकरणाची सुविधा असून काळ्या काचांच्या तपासणीसाठी टिंटमीटरचाही समावेश करण्यात आला आहे. या २ वाहनांच्या समावेशामुळे वाहतूक नियमांचं पालन न करणा-या वाहन चालकाला ओळखणं आता अधिक सुलभ होणार असून यामुळे वाहतूकीलाही शिस्त लागणं शक्य होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading