जपानमधील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी राज्यातील नगरविकास कामांचं महापालिका आयुक्तांकडून सादरीकरण

जपानमधील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीनं आकर्षित करण्यासाठी राज्यातील नगरविकास कामाचे सादरीकरण महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी करून राज्याच्या विकासाचा रोडमॅपच टोकिओ इथे झालेल्या भारत-जपान संयुक्त कार्यक्रमाच्या ११व्या परिषदेमध्ये सादर केला. टोकिओ येथे नागरी विकास या विषयावरच्या ११व्या भारत-जपान संयुक्त कार्यपरिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी केंद्रीय आणि गृह आणि नगरी विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिका-यांचं शिष्टमंडळ सहभागी झालं आहे. या शिष्टमंडळात एकमेव महापालिका आयुक्त म्हणून ते सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये गुजरात राज्याच्या वतीनं सादरीकरण करण्यात आलं. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेऊन जपानसाठी महाराष्ट्रामध्ये असलेल्या गुंतवणूक संधीची माहिती दिली. या परिषदेमध्ये जपान मधील गृहनिर्माणासाठी असलेला वित्तीय पॅटर्न, पावसाळी पाण्याचं नियोजन, मलनिस्सारण व्यवस्था यासह नागरी विकासाच्या अनुषंगाने विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading