रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून कारटेप आणि मुद्देमाल लंपास करणा-या त्रिकुटाला अटक

रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून कारटेप आणि मुद्देमाल लंपास करणा-या त्रिकुटाला पोलीसांनी अटक केली आहे. ठाणे-मुंबई परिसरात कारच्या काचा फोडून कारटेप आणि इतर मुद्देमाल लांबवणा-या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्यानंतर वागळे गुन्हे शाखा युनिट ५ च्या पोलीस पथकानं या त्रिकुटाला गजाआड केलं आहे. जगन्नाथ सरोज, दिनेश काश्यप हे दोघे नालासोपा-याचे असून तिसरा मुद्देमाल विक्री करणारा आरोपी मुंब्र्यातील आहे. या तिघांच्या चौकशीत त्यांनी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ठाणे शहर, मुंबई आणि मुंबई उपनगर, ठाणे ग्रामीण, पुणे शहर आणि रत्नागिरी अशा विविध ४५ ठिकाणी या आरोपींना अशाप्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. या त्रिकुटानं कासारवडवली, चितळसर, कापुरबावडी, वर्तकनगर, वागळे इस्टेट, ठाणे नगर, नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ तर ठाणे ग्रामीण आणि मुंबई शहर परिसरात अशा ४३ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांनी चोरलेल्या कारटेप पैकी १६ महागडे कारटेप हस्तगत करण्यात आले आहेत. हे त्रिकुट कारमधील महागडे कारटेप चोरी करून मुंबईच्या चोर बाजारात विकत असत अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading