कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोजागरी महोत्सव साजरा

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोजागरी महोत्सव साजरा करण्यात आला. या कोजागरी कार्यक्रमात मोखाडा येथील राजन वैद्य यांच्या आदिवासी पथकानं दोन तास रसिकांचे मनोरंजन केले. या पथकामध्ये ३५ कलाकार सहभागी झाले होते. आदिवासी लोकांची जीवनशैली दाखवणारी ही नृत्यकला पाहण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली होती. प्रत्येक नृत्यापूर्वी संवादातून नृत्याबद्दल माहिती दिली होती. तारपा कसा तयार केला जातो, बोहाड्याचा संबंध देवदेवतांशी कसा असतो, ढोल नृत्यातून पुरूषांची जीवनशैली कशी व्यक्त होते याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या ठिकाणी ढोल नाचवत माणसांचे मनोरे रचण्यात आले. घोडे वाघ यासारखे प्राणी आजूबाजूला धावत होते. काठवरच्या कोलांट्या, वाघावर स्वार होणे अशी कौशल्यही सादर करण्यात आली. या कार्यक्रमात लोकसाहित्याचे अभ्यासक सदानंद राणे आणि राजन वैद्य यांचा खास सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading