ठाण्यातील सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. महेश बेडेकर ठरले जुन्या आणि प्रसिध्द अशा बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र

ठाण्यातील सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. महेश बेडेकर यांनी शिकागो मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करून बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत. शिकागो मॅरेथॉन स्पर्धा काल झाली. ही स्पर्धा त्यांनी ३ तास १५ मिनिटं आणि ५८ सेकंदात पूर्ण केली. त्यामुळं ते बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. बोस्टन मॅरेथॉन स्पर्धा ही सर्वात जुनी स्पर्धा असून प्रत्येक धावपटूचं या स्पर्धेत सहभागी होण्याचं स्वप्न असतं. या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी ३ तास २० मिनिटांपेक्षा कमी वेळेची आवश्यकता होती. अमेरिकेत झालेल्या शिकागो मॅरेथॉन स्पर्धेत १३० देशातून ४५ हजाराहून अधिक मॅरेथॉनपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी १३ हजार स्वयंसेवक होते. डॉ. महेश बेडेकर यांनी आत्तापर्यंत जगभरातील ८ मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्या असून ही त्यांची महत्वाची अशी पाचवी स्पर्धा होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading