ठाणे महापालिकेचा बहुचर्चित वॉटर फ्रंट प्रकल्प अडचणीत

ठाणे महापालिकेचा बहुचर्चित वॉटर फ्रंट प्रकल्प अडचणीत आला आहे. महाराष्ट्र किनारा पट्टी नियमन प्राधिकरणानं ठाणे महापालिकेला वॉटर फ्रंट प्रकल्पाचं काम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. वॉटर फ्रंट प्रकल्पाच्या कामात किनारा नियमन आदेशाचं उल्लंघन झाल्यामुळं या प्रकल्पाचं काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानंही वॉटर फ्रंटच्या कामास परवानगी देण्यास विरोध दर्शवला आहे. ठाणे महापालिकेसाठी हा मोठा धक्का असून जे प्राधिकरण परवानग्या देते त्यांनीच काम थांबवण्यास सांगितल्यामुळे महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading