जोशी-बेडेकर महाविद्यालयात ख्रिसलिस २०१९ आंतरमहाविद्यालयीन महोत्सव

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयात ख्रिसलिस २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचं उद्घाटन झालं. ख्रिसलिस म्हणजे कोशात असलेला सुरवंट ज्याचं फुलपाखरात रूपांतर होतं. साध्या किड्यापासून फुलपाखरात संक्रमणाचा हा उपयुक्त कालखंड. या महोत्सवात मुंबई-ठाण्यातील बहुसंख्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यावर्षीचा ख्रिसलिस महोत्सव शाश्वत विकास या विषयावर आयोजित करण्यात आला होता. जो स्वत:च्या व्यक्तीमत्वात समतोल राखतो तोच चांगला व्यवस्थापक होऊ शकतो असं महाविद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी सांगितलं. सध्या आपण सर्वजण प्राणांतिक स्पर्धेच्या युगात वावरत आहोत. इव्हन इफ यु विन द रॅट रेस यु आर स्टील अ रॅट असं व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक शुभ्र अरविंद बिराबर यांनी सांगितलं. एखादं फुल उमलतं तेव्हा त्याचा सुगंध आपसूक यायला लागतो. फुलाला आपल्या सुगंधाची जाहिरात करावी लागत नाही त्याप्रमाणे यशस्वी व्यक्ती होण्यासाठी स्वत:मध्ये आमुलाग्र बदल घडवून आणावा लागेल तेव्हाच त्याच्या किर्तीचा सुगंध येईल. व्यक्तीच्या विकासात त्याचा अध्यात्मिक विकास होणं महत्वाचं आहे असं प्रतिपादन शुभ्र अरविंद यांनी केलं. या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत ४५ महाविद्यालयांनी भाग घेतला होता. सीएचएम महाविद्यालयाला फिरता चषक प्रदान करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading