शिवसेनेच्या गणेश दर्शन स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना ४ लाखांची पारितोषिकं दिली जाणार

शिवसेनेच्या ठाणे जिल्हा शाखेनं यंदाही जिल्हा स्तरावरील श्रीगणेश दर्शन स्पर्धेचं आयोजन केलं असून या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना ४ लाखांची पारितोषिकं दिली जाणार आहेत. या स्पर्धेचे आयोजक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. या स्पर्धेचं यंदाचं हे ३०वं वर्ष आहे. ठाणे आणि कल्याणसाठी वेगवेगळी पारितोषिकं दिली जाणार आहेत. या स्पर्धेतील पारितोषिकांसाठी विचार करताना मूर्तीची सुबकता, मांगल्य, आरास, त्यातील वैविध्य, नेत्रदीपकता आणि त्यातून प्रकट होणारी आशयगर्भता तसंच देखाव्यातून प्रतित होणारं हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव या बाबी प्रामुख्यानं पाहिल्या जाणार आहेत. या स्पर्धेच्या अर्जांसाठी टेंभीनाका येथील आनंदाश्रमामध्ये संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading