ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे उद्या पोलीस हुतात्मा दिनाचं आयोजन

समाज हित आणि देशाच्या रक्षणासाठी एकनिष्ठतेने शहीद झालेल्या पोलीसांना उद्या मानवंदना देण्यात येणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे उद्या पोलीस हुतात्मा दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे गस्त घालणा-या १० पोलीस जवानांवर दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात १० पोलीस शहीद झाले. या पोलीस जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची स्फूर्ती मिळावी तसंच कर्तव्य आणि राजनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून या शहीद जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस देशभर पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. उद्याच्या कार्यक्रमात देशभरात शहीद झालेल्या ४१४ शहीद जवानांना मानवंदना देण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील पोलीस हवालदार सुनिल कदम, सुरेश गावडे, पोलीस कॉन्स्टेबल सामिश मढवी या शहीदांनाही मानवंदना दिली जाणार आहे. उद्या सकाळी ७ वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading