युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते आगरी कोळी भवनाचं भूमीपूजन

कासारवडवली येथे आगरी कोळी भवन उभारलं जाणार असून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या आगरी कोळी भवनाचं भूमीपूजन झालं. घोडबंदर रोड परिसरात विकासाची कामं होत असताना या परिसरातील भूमीपुत्रांनी नेहमी सहकार्य केलं. घोडबंदर रोड रस्त्यावरील मुख्य रस्त्याचं रस्ता रूंदीकरण, अंतर्गत रस्ता रूंदीकरण अशा अनेक विकासकामात या समाजानं महापालिकेला सहकार्य केलं. या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी मोठं सभागृह उपलब्ध नसायचं. शहरातील वाढत जाणारी लोकसंख्या लक्षात घेता वाघबीळ, कासारवडवली, ओवळा, भाईंदरपाडा तसंच आसपासच्या परिसरातून आगरी-कोळी संस्कृती नष्ट होत चालली होती. अशावेळी या समाजाची संस्कृती, जडणघडण आणि इतर गोष्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचणं काळाची गरज असल्यानं त्यासाठी आगरी-कोळी भवनाची गरज होती. तशी मागणीही आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे झाली होती. आमदार प्रताप सरनाईक यांनी यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला. कासारवडवली येथील वेदांत हॉस्पिटल जवळील विकासकानं १४५९ चौरस मीटरचा भूखंड महापालिकेकडे हस्तांतरीत केला. त्याच ठिकाणी भवन उभारण्यासाठी मंजुरी मिळाली. आता हे भवन पूर्ण झाल्यानंतर आगरी-कोळी समाजातील ट्रस्टला हे भवन चालवण्यास द्यावं अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading