TMC

मीरा-भाईंदरच्या महापौरांनाही स्पर्धा रद्द करण्याबाबत सूचना करावी – महापौरांचा टोला

एकीकडे मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याचं आवाहन केलं जात असतानाच दुसरीकडे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या रविवारी ही स्पर्धा होणार आहे. गेल्या दोन महिन्यापासून या स्पर्धेची तयारी सुरू आहे. मॅरेथॉन स्पर्धेसाठी ४० लाखांचा खर्च अपेक्षित असून अचानक स्पर्धा रद्द केल्यास हा खर्च वाया जाईल. पूरग्रस्तांना मदत करायची झाल्यास ती वेगळ्या माध्यमातून करणं शक्य आहे. ठाण्याबरोबरच मीरा-भाईंदर महापालिकेनंही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. तिचा खर्च १ कोटी रूपये आहे. त्या तुलनेत ठाणे महापालिकेचा खर्च अत्यल्प आहे. मीरा-भाईंदर महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून नारायण पवार यांनी मीरा-भाईंदरच्या महापौरांनाही स्पर्धा रद्द करण्याबाबत सूचना करावी असा टोला महापौरांनी लगावला आहे.

Comment here