पोलिसांच्या कुटुंबियांना वर्तक नगरमध्ये एम. एम. आर.डी. ए. ची घरे

पोलिसांच्या कुटुंबियांना वर्तक नगरमध्ये एम. एम. आर.डी. ए. ची घरे मिळाली आहेत. वर्तक नगर येथील पोलीस वसाहत इमारत क्रं. ५१,५२,५३ या इमारतींना धोकादायक झाल्या असल्याकारणाने नोटीस बजावून तात्काळ खाली करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यामुळे हवालदिल झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमदार प्रताप सरनाईक यांची भेट घेतली असलात कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. असे आश्वासन दिले होते. परंतु एम. एम. आर.डी. ए.ची घरे लोढा कॉम्प्लेक्स भाईंदर पाडा येथे उपलब्ध असल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांनी त्या ठिकाणी जाण्यास नकार दिला होता. तसेच वर्तक नगर येथील आकृती हब टाऊन येथील घरांचे काम पूर्ण झालेले नव्हते. तसेच एम. एम. आर.डी. ए. चे आयुक्त ही घरे महापालिकेस देण्यास तयार नव्हते. अश्यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या कुटुंबियांनसाठी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले. त्यावेळी पालक मंत्रीएकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या माध्यमातून एम. एम. आर.डी. ए. च्या अधिकार्यांना आकृती हब टाऊनची घरे हि महानगरपालिकेकडे पोलिसांच्या कुटुंबीयांकरिता त्वरित हस्तांतरित करा अशा प्रकारचे आदेश दिलेले होते. परंतु ही इमारत पुर्ण झालेली नसल्याकारणाने मोठा पेच प्रसंग उभा राहिला होता.आमदार प्रताप सरनाईक यांनी आकृती हबटाऊनचे विकासक विमल शहा यांच्याशी संपर्क साधून एक महिन्यामध्ये रात्रं – दिवस काम करून विकासकाकडून इमारत पुर्ण करून घेतली. कालमहानगरपालिकेचे सचिव अशोक बुरपुल्ले यांच्याकडे विकासकातर्फे चाव्या देण्यात आल्या.यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading