कळव्याहून मुलुंडच्या दिशेने जाणार्‍या टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर 19 जखमी

कळव्याहून मुलुंडच्या दिशेने जाणार्‍या टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने साकेत येथील झाडावर जावून आदळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून 19 जण
जखमी झाले आहेत. ठाण्यातील साकेत पुलानजीक घडली.सुदैवाने  ग्रस्त टेम्पो झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.सर्व जखमींना आधी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात
आले.अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला असून चालकाविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडल्याचा
प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. एका टेम्पोमधून कळवा आणि मुंब्रा येथील 20 मजुरांना घेऊन निघालेल्या टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने नाशिक-मुंबई महामार्गावरील साकेत पुलानजीक टेम्पो
चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला.या भीषण अपघातात आलम शेख याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू जाला. तर अजगर शेख, अनिल म्हेत्रे, मोहम्मद शेख अझिझ,
इकबाल शेख, अब्दुल शेख, परवेश खान, इब्राहिम नाखुडा मोहम्मद सामी, मिलान शेख, इस्राफील शेख, मोहम्मह आसीफ, हरून शेख, मोहम्मद अन्सारी, अदनान शेख,करीम शेख, चांद अन्सारी,
शाहीद शेख, रविंद्र जाधव हे सर्व 19 जण जखमी झाले आहेत.सर्व जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात कापूरबावडी पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबईतील रस्त्यावरील झाडे कापण्यासाठी दररोज ठेकेदारामार्फत पाठवलेल्या वाहनाने आम्ही मुंब्रा येथून
जात असतो. त्यानुसार आज देखिल आम्ही कामसाठी निघालो, मात्र, क्षमतेपेक्षा अधिक मजूर या गाडीत होते. त्यामुळे साकेत येथे वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी झाडावर जावून आदळली
असल्याचे माहिती बचावलेल्या मजुराने दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading