कचराळी तलावात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे महापौरांचे आदेश

महापालिकेसमोरील कचराळी तलावात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिले आहेत. ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार महापौरांनी काल कचराळी तलावाची अधिका-यांसमवेत पाहणी केली त्यावेळी महापौरांनी हे आदेश दिले. कचराळी तलाव परिसरातील कारंज्याची दुरूस्ती करणे, बंद असलेले एलईडी दिवे बसवणे तसंच या ठिकाणी असलेल्या खुल्या रंगमंचावर शेड उभारणे, तलाव परिसरातील वाढलेल्या झाडांची छाटणी करणे, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकांची संख्या वाढवणे, तलावाभोवती असलेल्या पदपथावर दुचाकी वाहनं येऊ नये यासाठी बोल्डर बसवणे, तलाव परिसराची नियमित साफसफाई करणे अशा अनेक सूचना महापौरांनी या पाहणी दरम्यान अधिका-यांना दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading