मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान केंद्रांवर सुविधांची बरसात

निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपाय योजना केल्या जात असून यंदाच्या निवडणुकीत तर यामध्ये मोठी भर पडली आहे. मतदारांना मतदान करणं सुलभ व्हावं यासाठी गेल्या निवडणुकीत मतदान केंद्रावर सात प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आता यावर्षी त्यामध्ये दुप्पटीनं वाढ करण्यात आली आहे. आता मतदान केंद्रावर वेदनाशामक औषधं, ओआरएस पावडर, जखमेवर लावण्यासाठी पट्टी, वैद्यकीय सहाय्यक वाढत्या तापमानात मतदारांना उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून मतदान केंद्रांवर मंडपाची सुविधा, मतदारांच्या सहाय्यासाठी स्वयंसेवकाची नेमणूक इतकंच नाही तर महिला मतदारांसोबत येणा-या लहान मुलांकरिता प्रत्येक मतदान केंद्रांवर पाळणाघराची सुविधाही दिली जाणार आहे. या ठिकाणी एक प्रशिक्षित सहाय्यक मुलांची काळजी घेण्यासाठी नियुक्त केला जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरूषांसाठी, महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिक तसंच दिव्यांगांसाठी तीन वेगळ्या रांगा असणार आहेत. रांगेतील दोन महिलांनी मतदान केल्यावर एका पुरूष मतदाराला मतदानासाठी सोडलं जाणार आहे. मात्र ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मतदान करताना प्राधान्य दिलं जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading