बांदोडकर महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

एनसीसी दिनाचे औचित्य साधून विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या वन महाराष्ट्र बटालियन एनसीसी बॉईज विंग,राष्ट्रीय सेवा योजना,लायन्स क्लब ऑफ कांजूर विक्रोळी आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिव्हिल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या जिमखान्यात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोझेस कोलेट, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या हस्ते झाले. या शिबिरात ठाणे शीघ्र कृती दलाचे प्रमुख पोलीस उपायुक्त राजू पाटील यांच्या क्युआरटी कडून चार ब्लॅक कमांडो यांनी रक्तदान केले. तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading