फिना वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्प‍ियनशीपसाठी ठाणेकर वेद दुसा या जलतरणपटूंची निवड

ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनचा जलतरणपटू वेद दुसा याची फिना वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्प‍ियनशीपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. फिना वर्ल्ड चॅम्प‍ियनशीपसाठी भारतीय संघात निवड होणारा वेद हा ठाण्यातील आतापर्यंतचा एकमेव जलतरणपटू आहे.

वेद दुसा हा ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे, अतुल पुरंदरे रुपेश घाग यांच्या मार्गदर्शखाली घेत आहे. वेद दुसा याची निवड झाल्‌याबद्दल प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी त्यांचे कौतुक केले असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सदर स्पर्धा ही 15 ते 18 सप्टेंबर या कालावधी सियचल्स देशात होणार असून या स्पर्धेसाठी वेद रवाना होण्यापूर्वी त्याची निवड झाल्याबद्दल नुकतेच केंद्रीय क्रिडामंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील तसेच कोकण पदवीधर मंचचे आमदार निरंजन डावखरे यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी दिल्या.

Leave a Comment

%d bloggers like this: