ठाण्यातील हरित पथावर मेलेल्या कुत्र्यामुळे काही काळ गोंधळ

ठाण्यातील हरित पथावर आज एका मेलेल्या कुत्र्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. ठाण्यामध्ये अतिशय वाजत गाजत हरित पथ उभारण्यात आले होते. या हरित पथावर नागरिकांना चालायला मिळावं अशी कल्पना होती. पण सध्या या हरित पथांकडे दुर्लक्ष झालं आहे. या हरित पथांवर कचरा, खड्डे पडणं असा प्रकार पहायला मिळत आहे, आज सकाळी नेहमीप्रमाणे लोक चालायला आले असताना या नागरिकांना दुर्गंधीने त्रस्त केलं. सेवारस्त्यावर असलेल्या हुंदाई शोरूमच्या समोर एक कुत्रा मरून पडला होता. त्याची दुर्गंधी सर्व रहिवाशांना त्रस्त करत होती. याप्रकरणी तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना योग्य उत्तरं न मिळाल्यामुळे फिरायला आलेले नागरिक संतप्त झाल्याचं पहायला मिळालं. शेवटी ही दुर्गंधी असह्य होत असल्याने सकाळी फिरायला आलेल्या काही मंडळींनी स्वत:च हा कुत्रा उचलून महापालिकेच्या गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत महापालिकेचे सफाई कामगार आले आणि त्यांनी उचलून हा कुत्रा गाडीत टाकला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading