जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत स्टारफीशनं पटकावली तब्बल ३४ पदकं

२२व्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत स्टारफीशनं तब्बल ३४ पदकं पटकावली आहेत. या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या जलतरण पटूंनी विविध गटात २० सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदकं पटकावली. सवर आकुसकर हिनं ४ सुवर्ण १ रौप्य, आदित्य घागनं २ सुवर्ण, इदांत चतुर्वेदीनं १ सुवर्ण ३ रौप्य, आर्या गाडेनं २ सुवर्ण २ रौप्य आणि १ कांस्य, रोहन अंबुरेनं २ सुवर्ण १ रौप्य आणि १ कांस्य, आयुषी आखाडेनं १ कांस्य, विहान चतुर्वेदीनं ४ सुवर्ण १ रौप्य, श्रेया शहा हिनं १ सुवर्ण ३ कांस्य, शांता आखाडेनं १ सुवर्ण, आदेश ठाणेकरनं २ सुवर्ण तर रिले प्रकारात आदित्य घाग, रोहन अंबुरे, विहान चतुर्वेदी, इदांत चतुर्वेदी यांनी १ सुवर्णपदक पटकावलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading