कासारवडवली परिसरात बिबळ्याच्या पुन्हा दर्शनाने घबराट

ठाण्यामध्ये पुन्हा एकदा बिबळ्यानं दर्शन दिल्यानं घबराट निर्माण झाली आहे. काल मध्यरात्रीनंतर कासारवडवली परिसरात बिबळ्यानं दर्शन दिलं. कासारवडवली पेट्रोल पंपाजवळील एव्हीयाना इमारतीजवळ रात्री बिबळ्या दिसला होता. या गृहसंकुलाच्या क्लोज सर्कीट कॅमे-यामध्ये बिबळ्याची छबी टिपली गेली आहे. त्याचप्रमाणे पारिजात गार्डन या गृहसंकुलातही क्लोज सर्कीट कॅमेरामध्ये बिबळ्या फिरताना दिसला आहे. यामुळे या परिसरात काहीशी घबराट निर्माण झाली असून लहान मुलांना रात्री उशिरापर्यंत बाहेर खेळायला सोडू नये तसंच सावधगिरी बाळगावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading