शिक्षणाला अधिक सक्षम करायचं असेल तर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळवलं पाहिजे – डॉ. विजय बेडेकर

शिक्षणाला अधिक सक्षम करायचं असेल तर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळवलं पाहिजे, विद्यार्थ्यांनीही समाजोपयोगी संशोधन करून देशाच्या प्रगतीत मोलाचं योगदान दिलं पाहिजे असे विचार विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी व्यक्त केले. विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निवृत्त प्राध्यापकांच्या स्नेहसंमेलनात बोलताना डॉ. बेडेकर यांनी हे विचार व्यक्त केले. एखाद्या संस्थेचा ५० वर्षाचा काळ हा किती प्रगतशील आहे पाहणं महत्वाचं असून निवृत्त प्राध्यापकांनी मला महाविद्यालयानं काय दिलं हा विचार करताना मी महाविद्यालयाला काय दिलं हा ही विचार महत्वाचा असल्याचं सांगितलं. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं निवृत्त प्राध्यापकांचं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. महाविद्यालयाच्या प्रगतीत निवृत्त प्राध्यापकांचं योगदान अमूल्य असल्याचं प्रभारी प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी सांगितलं. यावेळी निवृत्त प्राध्यापकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. निवृत्त प्राध्यापकांना महाविद्यालयात बोलवून त्यांचा सन्मान केल्याबद्दल अनेक निवृत्त प्राध्यापकांनी संस्थेचे आणि महाविद्यालयाचे आभार मानले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading