36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुरुषाच्या दहा मीटर एअर रायफल गटात रुद्रांश पाटीलला चॅम्पियन होण्याचा बहुमान

ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांश पाटीलने शुक्रवारी 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्याने पुरुषाच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. यासह त्याने महाराष्ट्र संघाला सुवर्णपदकाचे खाते उघडून दिले. ठाण्याच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांशने फायनल मध्ये अचूक नेम धरत 17 गुणांची कमाई केली. यासह किताबाचा मानकरी ठरला. राष्ट्रीय नेमबाज आर्या बोरसेने महिलांच्या १० मीटर एअर रायफल गटामध्ये सहावे स्थान पटकावले. तिचा पदक जिंकण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. महाराष्ट्र संघाचा युवा नेमबाज रुद्रांश पाटील पात्रता फेरीमध्ये सर्वोत्तम कामगिरी सादर फायनल गाठली होती. यंदाच्या सत्रातील सर्वोत्तम कामगिरीमुळे तो या गटामध्ये किताबाचा दावेदार मानला जात होता. हाच विश्वास सार्थकी लावत त्याने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading