यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेत 75 सहभागा संस्थांचा सहभाग असणार आहे. नव वर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वतयारीच्या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली. यंदा देशाचं 75 वे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे हा 75 संस्थांचा सहभाग असणार आहे. यावर्षी डॉक्टर इंगळहळदीकर हे स्वागत अध्यक्ष असणार आहेत. नेहमीप्रमाणे नववर्षाच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव केला जाणार आहे. तलाव पाळी येथे गंगा आरती ला सुद्धा चार घाटांवर दीप उत्सवासाठी आणि गंगा आरतीसाठी 75 संस्थांचा आरतीला सहभाग असणार आहे. यावर्षी दहावी – बारावीची परीक्षा लवकर होत असल्यामुळे काही शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी या नववर्ष स्वागत यात्रेत मोठा सहभाग असेल असे न्यासाच्या कार्यवाह अश्विनी बापट यांनी सांगितलं. यंदाचा नववर्ष स्वागत यात्रेच बाविसाव वर्ष आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असल्यामुळे यंदा तेही या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणार आहे. दरवर्षी एकनाथ शिंदे नववर्ष स्वागत यात्रेला पंचांग पूजन आणि पालखीचे पहिले मानकरी असतात, यंदाही ते स्वतःहून सहभागी होणार आहेत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading