बँक ऑफ बडोदाच्या ठाणे पूर्व शाखेमध्ये मोठी चोरी झाल्याचं दिसत आहे. रात्रीच्या सुमारास बँकेच्या मागच्या बाजूला असलेल्या खिडकीतून चोरट्यांनी बँकेच्या शाखेत प्रवेश केला आणि ही चोरी केल्याचं सांगितलं जातं. बँकेतून १० हजार रूपयांची चोरी झाल्याचं प्राथमिकरित्या सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे काही कागदपत्रं गायब झाल्याचाही संशय आहे. पण एकंदर सर्व प्रकार पाहता भुरट्या चोरांनी ही चोरी केली असावी असा संशय व्यक्त होत आहे. सध्या बँकेच्या बाहेर बँक पुढील सूचनेपर्यंत बंद राहील अशी सूचना लावण्यात आली आहे. या चोरीबाबत अद्याप तरी कोणी बोलण्यास तयार नाही. मात्र मागच्या बाजूला असलेल्या खिडकीची संरक्षक जाळी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचं दिसत आहे. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.