२ जंगली वानरांचा वीजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू

२ जंगली वानरांचा वीजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. दोन जंगली वानरं वीजेच्या खांबावर चढली होती. या खांबावर त्यांना वीजेचा धक्का लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला कळवण्यात आली. आपत्कालीन कक्षाचे पथक येण्यापूर्वीच या वानरांचा मृत्यू झाला होता. काही अज्ञात मुलांनी या मृत वानरांचं रामनगर येथील डोंगरात दफन केल्याची माहिती या पथकाला देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading