१६ ते २२ जून या कालावधीत वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन

१६ ते २२ जून या कालावधीत वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी दरवर्षी प्रमाणेच यंदाही गोव्यातील श्रीरामनाथ देवस्थान येथे वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता सतिश कोचरेकर यांनी दिली. यंदाच्या महोत्सवामध्ये हिंदू राष्ट्र संसद या वैशिष्ट्यपूर्ण सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध विषयांवरील तज्ञ मंडळींचे परिसंवाद तसंच विशेष कार्य करणा-या मान्यवरांच्या मुलाखती हे यंदाच्या महोत्सवाचं आकर्षण आहे. लव जिहाद, हलाल सर्टीफिकेशन, लँड जिहाद, काशी मथुरा मुक्ती, धर्मांतर, गोहत्या, गड किल्ल्यावरील इस्लामी अतिक्रमणं, मंदिर संस्कृतीचं रक्षण, काश्मिरी हिंदूंचं पुनर्वसन अशा विविध विषयांवर या महोत्सवात विचारमंथन होणार आहे. या महोत्सवाला अमेरिकेपासून बांग्लादेश पर्यंत विविध देशातील तसंच विविध राज्यांमधील साडेतीनशेहून अधिक हिंदू संघटनांच्या दीड हजाराहून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आलं आहे. या महोत्सवाचं थेट प्रक्षेपण हिंदू जागृती डॉट ओआरजी यावर केलं जाणार आहे. जगभरातील हिंदुत्व निष्ठांनी या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading