१५ ते १८ वयोगटातील २९६९ मुलांचे लसीकरण पूर्ण

ठाणे महापालिकेच्या वतीने सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक, हेल्थवर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासाठी सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत आज एकूण १६३४ लाभार्थ्यांना बूस्टर डोस देण्यात आला. तर १५ ते १८ वयोगटातील २९६९ मुलांचे लसीकरण मोहिमेंतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या लसीकरण केंद्रात आज एकूण १६३४ सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक, हेल्थवर्कर्स व फ्रंटलाईन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या लसीकरण केंद्रात आज २९६९ मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून लसीकरण मोहिमेंतर्गत शहरात आतापर्यंत एकूण २६ लाख ११ हजार ४६२ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading