हिरानंदानी इस्टेट येथील फॉर्चुना इमारतीतील एका गॅलरीमधून पडून एका महिलेचा जागीच मृत्यू

हिरानंदानी इस्टेट येथील फॉर्चुना इमारतीतील एका गॅलरीमधून पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. हिरानंदानी इस्टेट येथील द वॉक मॉलजवळ फॉर्चुना इमारतीत राहणा-या रोहिणी मुल्की या ६५ वर्षीय महिला पाचव्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून दुस-या मजल्यावरील घराच्या गॅलरीत पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आपत्ती व्यवस्थापन कक्ष, कासारवडवली पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केलं आणि रोहिणी मुल्की यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयाकडे पाठवण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading