हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव यंदा रद्द

दिव्यांग मुलांसाठी साजरा करण्यात येणारा हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव यंदा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आला असल्याची माहिती आयोजक विलास ढमाले यांनी दिली आहे. ठाण्यातील बाळ गोपाळ मित्र मंडळ सह नारळवाला चाळ आणि पुनर्जिवन सामाजिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात करण्यात येतो. या उत्सवात दरवर्षी एकूण १२ हुन अधिक दिव्यांग शाळांचे सुमारे ५७२ पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होत असतात. या दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून अवयवदानाची जनजागृती करण्यात येते. परंतु यंदा कोरोनामुळे मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने यंदाचा मोहत्सव रद्द करण्यात आला आहे. ढमाले यांच्या वतीने ठाण्यात गेले २८ वर्ष दिव्यांग मुलांसाठी हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव निरंतर साजरा करण्यात येतो. दिव्यांग मुलांना इतर मुलांप्रमाणे सणाचा आनंद घेता यावा आणि मुलांच्या जीवनात जिद्द निर्माण व्हावी या हेतूने दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading