उत्तरायणापासून दिनमान वाढू लागल्यामुळे तापमान वाढते. मात्र सध्या दोन दिवस ठाण्यामध्ये थंडीचा अनुभव येत आहे. गेले दोन दिवस हवेतील गारठा चांगलाच वाढला आहे. अगदी सकाळी १० साडेदहा पर्यंत हवेतील गारवा अनुभवायला येतो. गेल्या दोन दिवसात तापमानामध्ये जवळपास १० अंशाचा फरक पडला असून तापमान सकाळच्या सुमारास २० अंशाच्या आसपास पहायला मिळत आहे. हवेतील गारठ्यामुळे सकाळी फिरायला जाणा-यांच्या संख्येत घट दिसत असून सध्या स्वेटर, मफलर दिसू लागले आहेत.