सौंदर्यकरण्याचे काम पूर्ण करण्यासाठी 15 जानेवारी चे उद्दिष्ट – महापालिका आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे करांना शहराबद्दल मुळातच असलेला अभिमान आणखीन वाढेल या उद्देशाने सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. त्यातून शहरात या विषयीची जबाबदारीची जाणीव वाढायला लागेल असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केल. सौंदर्यीकरणच्या आढावा आढावा बैठकीत ते बोलत होते. सौंदर्यीकरणाच्या कामामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे. हे काम जाणवण्यासाठी त्याची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता अनेक आयुक्तांनी व्यक्त केली. चौक सुशोभीत करून सौंदर्यीकरणाची बैठक तयार करणे नव्हे तर प्रत्येक रनिंग मीटरच्या सौंदर्य करण्याचा कार्यक्रम राबवण्यात यावा, त्यात विशेष लक्ष झोपडपट्टी आणि गावठाण क्षेत्रावरही असावे असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केल. रंग आणि चित्र या कामामुळे शहरातील भिंतींना रंगरूप मिळू लागले आहे सौंदर्यकरणाला बाधा येईल अशा जाहिरातीचे जाहिराती चिटकवण्याचे प्रमाण नैसर्गिक रित्या कमी होईल, शहरात स्वच्छता राखतानाच भिंतीवरील कामाचा रंग कामाचा दर्जा चांगला हवा हे काम वारा – पाऊस यांच्यामुळे खराब होऊ नये. किमान वर्षभर ते व्यवस्थित राहिले पाहिजे अशा सूचना पालिका आयुक्तांनी दिल्य. ठाणे कलाकार, जे जे कला महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्थानिक महाविद्यालयाचे विद्यार्थी, अशा दोन हजार जणांचा जमू बनवून प्रभाग समिती निहाय पुढील पंधरा दिवसात हे काम सुरू झाले पाहिजे आणि तीन महिन्यात पूर्ण झाले पाहिजे असे आयुक्तांनी स्पष्ट केले. दिवाळीतील रोषण निवडक ठिकाणीच पण आकर्षक पद्धतीने केली जावी म्हणजे त्यांचा वेगळेपण दिसेल. झाडांवरती सरसकट दिवे न लावता झाड त्यावरील पक्षांच्या वास्तवाला बाधा येणार नाही. तसेच झाडाच्या वाढीला अटका होणार नाही ही पथ्य कटाक्षाने पाळावी असेही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. सौंदर्यकरण्याचे काम पूर्ण करण्यासाठी 15 जानेवारी चे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तोपर्यंत हे काम पूर्ण व्हावे अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading