सोशल डिस्टन्सिंग पाळत ५० वा वाढदिवस आनंदाने साजरा केल्याचं आदर्श उदाहरण

एकीकडे संचारबंदीचं उल्लंघन होत असताना दुसरीकडे मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळत ५० वा वाढदिवस आनंदाने साजरा केल्याचं एक आदर्श उदाहरण दिसून आलं. ठाण्यातील एक उद्योजक नितीन केळकर यांचा ५०वा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांनी ऑनलाईन पध्दतीने साजरा केला. केळकर यांचा ५०वा वाढदिवस लॉकडाऊनमुळे कसा साजरा होणार म्हणून त्यांच्या कुटुंबियांचा हिरमोड झाला होता. पण त्यांच्या कुटुंबियांनी आगळ्यावेगळ्या पध्दतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केळकर यांच्या आयुष्यावरची एक छोटीशी चित्रफित तयार केली. यामध्ये त्यांची पत्नी, ज्येष्ठ बंधू आणि इतर कुटुंबियांनी मदत करून ऑनलाईन पध्दतीने हा वाढदिवस आगळावेगळा करून दाखवला. ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी तसेच कॅनडामधूनही एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एकत्र येऊन सर्व कुटुंबीयांनी त्यांच्यावरील चित्रफीत बघितली, ऑनलाइनच ओवाळण्याचा आणि घरीच बनवलेला केक कापण्याचा कार्यक्रमही जोरदारपणे साजरा केला. सर्वांसाठीच हा कार्यक्रम आंनदाचा ठेवा बनून राहिला. कठीण काळातही आपण कुटुंबियांशी कसे छान जोडलेले राहू शकतो याचं एक आदर्श उदाहरणच नितीन केळकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी दाखवून दिलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading