सिंगापूर कडून ५०० ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मिळणार

प्राणवायूच्या कमतरतेवर अगदी तातडीचा उपाय म्हणून सिंगापूर कडून ५०० ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मिळणार आहेत. यापैकी २५० कॉन्सट्रेटरचा पहिला टप्पा काल ठाण्यात आला. सिंगापूरमधून हे ऑक्सीजन कॉन्सट्रेटर पाठवण्यात आले आहेत. ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मुळे हवेतून ऑक्सीजन वेगळा करून तो रूग्णाला पुरवला जातो. ज्या ठिकाणी तातडीनं प्राणवायू पुरवणं अवघड आहे अशा ठिकाणी हे कॉन्सट्रेटर चांगलेच कामाला येतात. सुरूवातीला अडीचशे कॉन्सट्रेटर सिंगापूरहून आले असून उर्वरीत दुसरा अडीचशेचा टप्पा पुढील आठवड्यात मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील हे ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मराठवाडा आणि आजूबाजूच्या दुर्गम भागात दिले जाणार असून नंतरच्या दुस-या टप्प्यातील ऑक्सीजन कॉन्सट्रेटर हे पश्चिम महाराष्ट्र, ठाणे आणि आजूबाजूच्या भागाला दिले जाणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading